बी एम एस (BMS) बारावी नंतर एक उत्तम करिअर पर्याय || काय असत हे बीएमस || What is BMS ? Full Course information in Marathi

आज आपण जाणून घेणार आहोत बी एम एस विषयी. कसा हा  बारावी नंतर एक उत्तम पर्याय ठरतो. बी एम एस विषयी तुमचा मनात भरपूर प्रश्न असतील या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस)

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) हा तीन वर्षाचा अंडरग्रेजुएट प्रोग्राम आहे जो व्यावसायिक संस्थेच्या कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थापन क्षेत्रातील प्रगत अभ्यासक्रम आहे . बीएमएस हा मानव संसाधन व्यवस्थापन, अर्थशास्त्र आणि व्यवसाय अभ्यास यांचे सखोल ज्ञान देखील प्रदान करतो .

बी एम एस साठी प्रवेश पात्रता

बी एम एस ह्या कोर्स साठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांला बारावी (१०+२) उत्तीर्ण असणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी बारावी आर्ट्स, कॉमर्स आणि विज्ञान या तिन्ही शाखेने पैकी कोणत्याही शाखेतून केलेली असो त्यांना बी एम एस ह्या कोर्स साठी प्रवेश घेता येईल.

सामान्य पने बी एम एस ह्या कोर्स साठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते जसे CET, UGAT . या मध्ये विविध विद्यालये प्रवेश परक्षेतील गुण संख्येच्या आधारे विद्यार्थ्यांला प्रवेश देतात.

काही विद्यालयान मध्ये कोणतीही प्रवेश परीक्षा न घेता बारावी च्या गुण संख्येच्या आधारे प्रवेश दिला जातो.

Also Read: Bcom course information in Marathi

बीएमएस नंतर करिअर पर्याय व नोकरीच्या संधी

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी त्यांचा व्यावसायिक प्रवास सुरू करताना करिअरच्या वेगवेगळ्या संधी शोधू शकतात. तर त्याच बरोबर इच्छुक विद्यार्थी उच्च अभ्यासासाठी जाऊ शकतात आणि पदव्युत्तर पदवी घेऊ शकतात.

त्यांच्या कारकीर्दीत पुढे जाण्यासाठी आदर्श पर्याय एमबीए .

बी एम एस या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे पुरेसे आकलन केले जाते ज्यायोगे त्यांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. जसे शैक्षणिक संस्था, विपणन आणि विक्री, वित्त व किरकोळ व्यवसाय आणि सल्लामसलत इत्यादी

क्षेत्रात नोकरी मिळण्यास योग्य बनवले जाते. बी एम एस फ्रेशरचा सरासरी वार्षिक पगार रु. 3 लाख ते रू. 4 लाख. असा असतो.

बीएमएस पदवी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लोकप्रिय नोकरी मधील भूमिकांची सूची

  • मानव संसाधन कार्यकारी (HR Executive)
  • गुणवत्ता व्यवस्थापक (Quality Manager)
  • व्यवसाय विकास कार्यकारी (Business Development Executive)
  • सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments