एयर होस्टेस माहिती: पात्रता, प्रवेश प्रक्रिया, जॉब, स्कोप

एयर होस्टेस कोर्स परिचय: (Air Hostess Course Information in Marathi)

खूप विद्यार्थ्यांचे स्वप्न असते एअर होस्टेस बनायचे किंवा केबिन क्रिव मेंबर बनायचं. एअर होस्टेस किंवा केबिन क्रिव मेंबर बनण्यासाठी तुम्हाला काही कोर्स करावे लागतात. त्या कोर्स बद्दल ह्या आर्टिकलमध्ये मी आज तुम्हाला माहिती देणार आहे.

एअर होस्टेस/केबिन क्रिव कोर्ससाठी डिग्री कोर्स, डिप्लोमा कोर्स आणि सर्टिफिकेट कोर्स असतात.

हे कोर्स आपण Aviation कॉलेजमधून करू शकतो.

Air Hostess Course Information in Marathi
Air Hostess Course Information in Marathi

कोर्सेबद्दल थोड्यात माहिती:

डिग्री कोर्स३ वर्ष
डिप्लोमा कोर्स१ वर्ष
सर्टिफिकेट कोर्स६ महिने किंवा कमी
Air hostess Course Information in Marathi

एअर होस्टेस कोर्ससाठी मी पात्र आहे का?

एअर होस्टेस कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी काही अटी आहेत:

एअर होस्टेस कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी काही अटी आहेत:

  • वयाची अट – तुमचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. काही Aviation कॉलेज तुमचे वय १७ वर्षांपेक्षा जास्त असले तर तुम्हाला प्रवेश देतात. हे तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेत आहात त्यावर अवलंबून आहे.
  • शैक्षणिक पात्रता – तुमचे कमीत कमी १०+२ पर्यंत शिक्षण झालेले पाहिजे.
  • आवश्यक गुण – तुम्हाला १०+२ मध्ये ५०% पेक्षा जास्त गुण पाहिजे. जर तुम्हाला ५०% पेक्षा कमी गुण असतील तर तुम्हाला कोर्सला प्रवेश घेता येणार नाही.

एअर होस्टेस/केबिन क्रिव कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी काही एव्हिएशन इन्स्टिट्यूट्स तुमच्या १०+२ च्या गुणांच्या आधारे प्रवेश देतात. काही कोर्ससाठी एंट्रन्स एक्साम (प्रवेश परीक्षा) द्यावी लागते आणि परीक्षेच्या गुणांच्या आधारे ऍडमिशन होते.

एअर होस्टेस कोर्स प्रवेशासाठी टॉप कॉलेज:

एअर होस्टेस/केबिन क्रिव कोर्ससाठी महाराष्ट्रात असलेले काही कॉलेज आहेत:

  • फ्रॅन्कफिन इन्स्टिटयूट ऑफ एअर होस्टेस ट्रैनिंग
  • लेट्स फ्लाय-एअर होस्टेस ट्रैनिंग इन्स्टिटयूट
  • जेट्सकी एव्हिएशन Academy, एअर होस्टेस, केबिन क्रिव अँड पायलट ट्रैनिंग इन्स्टिटयूट
  • केबिन क्रिव ट्रैनिंग इन्स्टिटयूट (CCTI पुणे)
  • जेट इंडिया इन्स्टिटयूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी मॅनॅजमेन्ट

एअर होस्टेस कोर्स दरम्यान आवश्यक/develop होणारे काही कौशल्ये:

  • English Fluency
  • Communication Skills
  • Presence of Mind
  • Disciplined

स्कोप, कोर्स नंतर भेटणारे जॉब

एअर होस्टेस कोर्स केल्यावर तुम्हाला ह्या ठिकाणी जॉब भेटू शकतो:

  • Airline
  • एअर होस्टेस कॉलेज
  • Military
  • एअरपोर्ट

एअर होस्टेसचे जॉब्स आकर्षक पगारासाठी प्रसिद्ध आहेत. जर तुम्हाला एअर होस्टेस/केबिन क्रिव मेंबर कोर्स करायचा असेल तर तुम्हाला ज्या कॉलेजमधून हा कोर्स करायचा आहे त्या कॉलेजच्या वेबसाइटवर तुम्हाला सगळी माहिती भेटेल.

जर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही कॉलेजच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या फोन नंबर वर कॉल करून माहिती घेऊ शकता.

एअर होस्टेस काय काम करते?

  • प्रवास्यांचा प्रवास सुखमय होण्यासाठी एअर होस्टेस प्रयत्नशील असतात.
  • एअर होस्टेस प्रवास्यांची मदत करतात, प्रवास्यांना लागणारे खाद्य-प्रदार्थ किंवा पेय उपलब्ध करून देतात.
  • प्रवासी आजारी असल्यास एअर होस्टेस त्यांची मदत करतात.
  • एअर होस्टेस प्रवास्यांना त्यांच्या सेफ्टी आणि deplanning बद्दल माहिती देतात.
  • विमानाची लँडिंग झाल्यावर एअर होस्टेस प्रवास्यांना त्यांचे सामान काढण्यासाठी मदत करतात आणि बाहेरचा मार्ग सापडण्यास सहकार्य करतात.
  • विमानामधील सर्व सुरक्षा उपकरणे नीट काम करत आहेत कि नाही याची खात्री करणे एअर होस्टेसचे काम असते.

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments