बी कॉम म्हणजे काय?
बी कॉम हा बारावी नंतर करता येणार एक ग्रॅजुएशन कोर्स आहे.
कोणत्याही स्ट्रीम मधून बारावी झाल्यावर तुम्ही बी कॉम कोर्से करू शकता.
बी कॉम हा ३ वर्षाचा कोर्से असतो जो तुम्ही रेगुलर पद्धतीने कॉलेज मधून किंवा एक्सटेर्नल पद्धतीने करू शकता.
बी कॉम कोर्सचे पसंत केले जाणारे specializations कोणते?
बी कॉम कोर्सचे काही specializations आहेत:
बी कॉम कोर्सला प्रवेश घेण्यासाठी मी पत्र आहे का?
बी कॉम कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुमची बारावी पूर्ण झालेली पाहिजे.
बी कॉम कोर्सला प्रवेश घेण्यासाठी अशी काही अट नाही कि तुमची बारावी कॉमर्स स्ट्रीम मधून पूर्ण झालेली पाहिजे.
बा कॉम कोर्ससाठी तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधून तुमची बारावी पूर्ण केलेली असली तरी चालते.
काही कॉलेज प्रवेश परीक्षा पण घेतात. तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे ते कॉलेज बी कॉम कोर्सच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा (entrance exam) घेतात का याची माहिती तुम्हाला कॉलेजच्या वेबसाइटवर भेटेल. तुम्ही कॉलेज ला फोन करून पण हि माहिती काढू शकता.
शक्यतो बरेच कॉलेज विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देतात.
काही कॉलेज तुम्हाला बारावीमध्ये ५०% पेक्षा जास्त गुण असावे अशी प्रवेश पात्रतेमध्ये अट ठेऊ शकते.
बी कॉम कोर्स करण्यासाठी किती खर्च येतो?
बी कॉम कोर्सची फी तुम्ही कोणत्या कॉलेज मधून बी कॉम करणार आहेत त्यावर अवलंबून आहे.
फी ५ हजार ते ३-४ लाखापर्यंत असू शकते.
जर तुम्ही तुमच्या जवळच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार असाल तर तुम्हाला फक्त कॉलेज फी, प्रवासाचा खर्च, कॉलेजसाठी लागणारे इतर खर्च (पुस्तके, प्रोजेक्ट्स, इ.) एवढा खर्च येईल.
जर तुम्ही बाहेर जाऊन बी कॉम करणार असाल तर तुमचा हॉस्टेलचा खर्च आणि राहण्या खाण्याचा खर्च वाढेल. हॉस्टेलचा खर्च आणि राहण्या-खाण्याचा खर्च तुमचे कॉलेज कुठे आहे त्यावर अवलंबून आहे.
बी कॉम नंतर काय करावे? (Courses after Bcom)
बी कॉम करत असतांना तुम्ही काही सर्टिफिकेट कोर्सची तयारी करू शकता किंवा post -graduate प्रवेश परीक्षेची तयारी करू शकता.
बी कॉम करत असतांना तुम्ही Tally, MSCIT आणि इतर काही कोर्स करू शकतात.
शक्यतो बी कॉम करतांना विद्यार्थी MBA-CET ह्या प्रवेश परीक्षेची तयारी करतात.
Read: (MBA Course Information in Marathi)
काही विद्यार्थी competitive परीक्षेची तयारी करतात.
बी कॉम करतांना तुम्ही इंटर्नशिप पण करू शकता.
बी कॉम नंतर करता येणारे काही कोर्स आहेत:
बी कॉम नंतर बरेच विद्यार्थी एम बी ए किंवा एम कॉम करतात.
जर तुम्हाला बी कॉम नंतर एम बी ए करायचे असेल तर तुम्हाला बी कॉम करतांना एम बी ए एंट्रन्स परीक्षेची तयारी करावी लागेल.
बी कॉम कोर्सच्या आधारे तुम्हाला जॉब पण भेटू शकतो. जर तुम्हाला जॉब भेटला तर तुम्ही जॉब करता करता पुढचे शिक्षण करू शकता.