१२वी पूर्ण होताच, करियर संबंधित अनेक प्रश्न आणि पर्याय डोळ्या समोर उभे राहतात, अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा कला क्षेत्राकडे नेणाऱ्या पर्यायातून स्वतःसाठी उपयुक्त शाखा निवडणे बरेच वेळा कठीण होते.
पदवी, पदविका शिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला किंवा वाणिज्य, भरपूर पर्याय आणि भरपूर गोंधळ सुद्धा!
आज जाणून घेऊया एका करियर पर्यायाबद्दल, डी फार्म (D Pharmacy) बद्दल!!!
डी फार्मसी म्हणजे काय?
डी फार्मसी म्हणजे काय? औषध निर्माण शास्त्रत पदविका म्हणजेच डिप्लोमा इन फार्मसी (D Pharmacy), हा फार्मास्युटिकल सायन्स च्या क्षेत्रात करिअर-आधारित पदविकेचा कोर्स आहे.
दोन वर्षाच्या कालावधीत ह्या कोर्स द्वारे विद्यार्थ्यांना औषध आणि औषध निर्मिती आणि संदर्भित मूलभूत संकल्पनांसह परिचित करण्यासाठी हा कोर्स निर्माण करण्यात आला होता.
मी D Pharmacy मध्ये प्रवेश घेण्यास पात्र आहे का?
दोन वर्षांची D Pharmacy पदविका, बारावी उत्तीर्ण म्हणजेच १० + २ उत्तीर्ण विद्यार्ध्यांसाठी विकसित केलेला प्रास्ताविक अभ्यासक्रम आहे.
ह्या अभ्यासक्रमाची पात्रता खालील प्रमाणे आहे.
अभ्यासक्रमाचे नाव | डिप्लोमा इन फार्मसी (D Pharmacy) (औषध निर्माण शास्त्र पदविका) |
अभ्यासक्रमाचे स्वरूप | पदविका |
शैक्षणिक पात्रता | १२ वी पास. (कमीत कमी ५०% गुणांसह) (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा गणित विषयांसह) |
कालावधी | २ वर्षे. |
डी फार्म मध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया काय आहे?
१२वी नंतर D Pharmacy च्या पदविकेमध्ये प्रवेश घेण्यासाठी, इच्छुक उमेदवारांना प्रवेश परीक्षेला सामोरे जावे लागते.
ह्या प्रवेश प्रक्रियेचे दोन मुख्य प्रकार असतात, राज्याद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा तसेच, प्रवेश परीक्षेचा दुसरा प्रकार, म्हणजे विद्यापीठ प्रवेश परीक्षा (University Entrance Exam).
हि परीक्षा विद्यापीठांमध्ये परचलित असली तरीही काही विद्यापीठांमध्ये प्रवेश परीक्षा न घेता गुणवत्तेच्या आधारावर म्हणजेच मेरिट बेसिस वर देखील विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.
दोन्ही प्रकारच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम हा १२ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असतो.
राज्यस्तरीय प्रवेश परिक्षेतुन प्रवेश:
- उमेदवारांना राज्याद्वारे नियुक्त केलेल्या मंडळाकडे अर्ज करायचा असतो.
- एकदा अर्ज केल्यास, उमेदवारांना राज्यस्तरीय प्रवेश चाचणीत सहभागी होण्यासाठी आणि प्रवेशासंदर्भातील पुढील दिशानिर्देशांची वाट पाहण्यास सांगितले जाते.
- राज्याद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला महाराष्ट्रात महाराष्ट्र – सामान्य प्रवेश परीक्षा (MH -CET) नावाने ओळखले जाते. MH -CET द्वारे अभियांत्रिकी, औषध निर्माण, आणि ऍग्रीकल्चर इत्यादी शाखांमध्ये प्रवेश मिळवल्या जाऊ शकते.
- त्यानंतर आयोजित परीक्षेत प्रवेश परीक्षेतील संबंधित गुणांनुसार सर्व उमेदवारांची नावे असलेली यादी जाहीर केल्या जाते.
- संभाव्य विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येते.
- विद्यापीठांद्वारे निवडल्या गेलेल्या उमेदवारांना निर्धारित तारखेस आणि वेळेत समुपदेशनाच्या फेऱ्यांसाठी उपस्थित राहण्यास सांगितले जाते .
- समुपदेशन फेऱ्या दरम्यान उमेदवारांना त्यांच्या आवडीनुसार कोर्स व महाविद्यालय निवडण्यास सांगितले जाते.
- त्यानंतर विद्यापीठ किंवा प्रवेश समिती त्यांच्या गुणवत्तेच्या यादीतील उमेदवारांच्या जागा, कॉलेज व अभ्यासक्रमाची त्यांची पसंती आणि संबंधित निवडींमध्ये जागा उपलब्ध करुन देतात.
प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम १२वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असला तरीही नव्या जोमाने तयारी करण्याची गरज आहे.
MH – CET प्रवेश परीक्षा ची तयारी करण्यासाठी अनेक शिकवणी वर्ग प्रस्थापित आहेत आणि अनेक पुस्तके देखील बाजारात उपलब्ध आहेत.
असे असतांना एक नवीन पर्याय देखील जन्माला आला आहे – ऑनलाईन प्रशिक्षण. अनेक प्रशिक्षण संस्थान आपली प्रशिक्षण सामग्री इंटरनेट च्या माध्यमाने पण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत, या प्रयत्नांच्या मागचे कारण म्हणजे, घरून, आपल्या वेळेत, आपल्या गतींने शिक्षण घेऊ इच्छितांचा वाढत आकडा आहे.
युट्युब चॅनेल्स वर मोफत उपलब्ध असणाऱ्या सामग्रीपासून तर ऑनलाईन लाईव्ह आणि रेकॉर्डेड पद्धतीने घेतल्या जाणारे शिकवणी वर्ग (online class) असो, रिमोट पद्धतीनी शिक्षण अत्यंत सोपे, खर्चाला परवडणारे आणि लवचिक असल्याचे दर वेळी ठरत आले आहे आणि म्हनुनच MH – CET साठी तयारी करताना ऑनलाईन शिक्षणाकडे एक उत्तम पर्याय म्हणून बघितले जाते.
मला डी फार्म मध्ये काय शिकायला मिळेल?
डी फार्म, हा एक पदविका अभ्यासक्रम आहे, ज्या द्वारे दोन वर्षांच्या कालावधी मध्ये विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्र आणि औषध विर्की बाबत महत्वाचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येते.
जसे,
- प्रिस्क्रिप्शन ला सुरक्षित आणि अचूक प्रकारे वितरित करणे
- औषधांचे वितरण आणि मिश्रण
- अन्न व औषध कायद्यांतर्गत अचूक रेकॉर्ड ठेवणे
- खरेदी, विक्री व माल नियंत्रण
- थर्ड-पार्टी बिलिंग चा अभ्यास
- औषधांना मंजुरी मिळवण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास.
- मादक पदार्थांचे नियंत्रण आणि संबंधित कायदे.
- फार्मास्युटिकल न्यायशास्त्र (फार्मसीच्या व्यवसायाचे नियमन करणारे कायदे)
- औषधांच्या चाचणी, तपासणी आणि क्लिनिकल चाचण्यांसह आवश्यक नियम आणि कायदे
- रुग्ण प्रदाता संबंध
D Pharmacy पदविकेच्या समाप्ती नंतर, विद्यार्थी फार्मसी संबंधित थेट विक्री किंवा निर्माण क्षेत्रात काम करण्यास तयार आणि पात्र होईल.
डी फार्म पूर्ण केल्यावर नोकरी/व्यवसायाच्या कोणत्या संधी आहेत?
D Pharmacy एक व्यावसायिक दृष्ट्या फार अष्टपैलु आभ्यासक्रम आहे, ह्या शिक्षणा दरम्यान विद्यार्थी औषधनिर्माण शास्त्रातील अनेक नोकरी व व्यवसायाच्या संधींसाठी तयार होतो.
तसे करण्याआधी, विद्यार्थ्यांने स्वतःची नोंद फार्मसीस्ट म्हणून करून घेणे आवश्यक आहे.
नोंदणीकृत फार्मासिस्ट म्हणजे एक असा व्यक्ती आहे ज्याचे फार्मसी क्षेत्रामध्ये शैक्षणिक पात्रता आहे आणि त्याचे नाव, त्याच्या राज्यातील राज्य फार्मसी कौन्सिल अंतर्गत नोंदणीकृत आहे.
हि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच, नोंदणीकृत फार्मासिस्ट म्हणून सर्व नोकरी आणि व्यावसायिक संधींना संपूर्ण पात्र ठरतो.
- पात्र उमेदवार खाजगी किंवा सरकारी रुग्णालयांच्या औषध स्टोअरमध्ये नोकरी मिळवू शकतो.
- आरोग्य क्लिनिक, स्वयंसेवी संस्था, सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधे लिहून, औषधांचे वितरण आणि सल्ला निर्देश देण्या साठी देखील फार्मासिस्ट ची गरज असते
- प्रक्रिया नियंत्रण, उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण यासारख्या विविध विभागांमधील फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये देखील एन्ट्री लेव्हल नोकर्यासाठी डी फार्म उत्तीर्ण उमेदवारांची गरज असते.
- पात्र उमेदवार वैद्यकीय प्रतिनिधी म्हणूनही काम करून उत्तम मिळकत मिळवू शकतात.
- उद्योजकते कडे वळण असणारे पात्र उमेदवार, परवाना प्राप्ती नंतर स्वतःचे रिटेल फार्मसी आउटलेट, घाऊक व्यवसाय किंवा शस्त्रक्रिया वस्तूंचे दुकान देखील उघडू शकतात.
- साधारणपणे, डी फार्म पूर्ण केल्यानंतर पात्र उमेदवारांना नोकरीतील प्रारंभिक पगार दरमहा आठ ते वीस हजार रुपये इतका असतो.
- परंतु या बाबतचे बरेच काही उमेदवाराच्या गुणवत्तेवर, वैयक्तिक कौशल्यांवर, नियोक्ताच्या प्रोफाइल, आपले नोकरीचे प्रोफाइल आणि नोकरीच्या स्थानावर देखील अवलंबून असते.
आपल्या यशाची शक्यता वाढविण्यासाठी आपण डी फार्म च्या पुढील अभ्यासक्रम म्हणजे फार्मसी मध्ये पदवी चे आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा अभ्यास करू शकता.
जर तुम्हाला फार्मास्युटिकल क्षेत्रात तुमचा आनंद आणि आवड सापडली असेल तर आपण फार्मसीमध्ये पदवी घेऊ शकता.
असे ठरवतांना लक्ष्यात घ्या की जर तुम्ही डी.फार्म आधीच पूर्ण केले असेल तर तुम्ही थेट बी.फार्म च्या दुसर्या वर्षासाठी अर्ज करू शकता. हा अर्ज करण्या पूर्वी आपल्या आवडीच्या कॉलेज किंवा विद्यापीठासोबत संपर्क साधायला विसरू नका.
[snippet]
तुम्हाला आवडतील असे काही इतर फार्मसी कोर्स –
B Pharmacy Information in Marathi
Pharm D Information in Marathi
[/snippet]
इतकाच नव्हे तर तुम्ही पदव्युत्तर, म्हणजेच एम फार्म चे शिक्षण घेण्याचा निर्णय देखील घेऊ शकता.
तुमच्या करिअर ला एक चांगले आणि आगळे वेगळे वळण म्हणून तुम्ही डी फार्म नंतर, कायद्याची पदवी देखील घेऊ शकता. तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी व्यवसाय व्यवस्थापन देखील निवडल्या जाऊ शकते.
आम्ही सर्व वाचकांना शुभेच्छा देतो आणि आशा करतो त्यांचे शिक्षण संबंधित सर्व निर्णय समाधानकारक आणि यशस्वी ठरतील.