शिक्षण हे एक सतत बदलणारे क्षेत्र आहे आणि या बदलांमुळेच आपण व्यावसायिक आणि संबंधित क्षेत्रात बदल घडून येतांना आपण बघतो, अश्या बदलांच्या शृखलांचा परिमाण म्हणजेच भारतातील शिक्षण क्षेत्रात नव्याने येणाऱ्या अनेक अभ्यासक्रम होय. फार्म डी अभ्यासक्रम पण ह्याचेच एक उदाहरण आहे. तर आज जाणून घेउया फार्म डी बाबत
फार्म डी चा अर्थ काय? (Pharm D Meaning)
फार्म डी म्हणजेच “डॉक्टर ऑफ फार्मसी” हा एक व्यावसायिक फार्मसी संबंधित डॉक्टरेट प्रोग्राम आहे. भारतात, १० + २; बारावी किंवा डी. फार्म नंतरचा हा सहा वर्षांचा शैक्षणिक अभ्यासक्रम आहे ज्यात पाच वर्षांचा शैक्षणिक अभ्यास आणि एक वर्षाची इंटर्नशिप चा समावेश असतो.
मुख्य समजून घेण्याचा मुद्दा असा कि हा अभ्यासक्रम एम. फार्म म्हणजे मास्टर इन फार्मसी (पद्युत्तर कोर्स) पेक्षा थोडा वेगळा आहे.
डी फार्म आणि फार्म डी फरक
आता जाणून घेऊया डी फार्म आणि फार्म डी मधील ठळक फरक
नावातल्या साम्य मुले अनेक उमेदवार डी फार्म आणि फार्म डी मध्ये गोंधळून जातात, हा तुलनात्मक तक्ता त्या गोंधळातून तुम्हाला सुटण्यात मदतीचा ठरेल.
अभ्यासक्रमाचे नाव | फार्म डी – डॉक्टर ऑफ फार्मसी | डी फार्म – डिप्लोमा इन फार्मसी |
अभ्यासक्रमाची कालावधी | ६ वर्ष (पाच वर्षांचा शैक्षणिक अभ्यास आणि एक वर्षाची इंटर्नशिप) | २ वर्ष |
पात्रता | १० +२ (किमान 50%) किंवा डी फार्म | १० + २ (किमान ५०%) |
भविष्यातील संधी | प्रवेश स्तरीय पोझिशन्स | उच्च स्तरीय पोझिशन्स |
फार्म डी अभ्यासक्रमाचा एक वैशिष्ट्य आवृत्ती देखील अस्तित्वात आहे, पदव्युत्तर आवृत्ती चा फार्म डी अभ्यासक्रम
3 वर्षाच्या फार्म डी अभ्यासक्रमासाठी (पदव्युत्तर शिक्षण) –
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत मान्यता प्राप्त संस्थेतून बॅचलर ऑफ फार्मसी अभ्यासक्रम पास केलेले उमेदवार फार्म डी अभ्यासक्रमासाठी पात्र विद्यार्थी आहे.
तसेच पात्र आणि इच्छुक उमेदवारांना त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण अर्थात १० + २ मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्र विषयांसह समतुल्य केले असावे.
Pharm D चे शिक्षण का घ्यावे?
फार्म डी अभ्यासक्रमाचे स्वतःचे तर फायदे आहेतच परंतु ते स्पर्धात्मक जगात देखील महत्वाचे आहे. फॅर्म डी पदवीधरांची मागणी आजच्या स्पर्धात्मक जगात फार जास्त आहे. आणि ह्या शिक्षणाचे देखील अनेक नफे आहेत, जसे कि
समाजामध्ये सहभाग: फार्मसिस्ट हा समुदायाचा एक महत्त्वाचा भाग आहे कारण तो रुग्णांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणात योगदान करतो आणि म्हणूनच फार्मसी संबंधित क्षेत्रात सक्रिय व्यावसायिकांना समाजामध्ये मानाचे स्थान देण्यात येते.
करिअरचे अनेक पर्यायः या क्षेत्रात करिअरचे विविध पर्याय आहेत. फार्मासिस्ट संस्था, नर्सिंग होम, रुग्णालये, महाविद्यालये आणि वैद्यकीय उद्योगात काम करू शकणे असे अनेक पर्यायातून एका उज्वल भविष्याची निवड करणे सोपे होते.
वाढ: फार्मसी उद्योगाचा वाढीचा दर नेहमीच फार वेगवान राहिला आहे आणि सध्या देखील तीच परिस्थिती कायम आहे .
स्वायत्तता: कामाची स्वायत्तता आहे कारण आपण आपले कार्यस्थान आणि कामाचे तास निवडू शकता. आपण एखादे काम करू शकता किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
अभ्यासक्रमाची पात्रता (Eligibility)
फार्म डी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे पात्रतेचे काही निकषांवर ठरवण्यात आले आहे,
प्रवेश प्रक्रिये बद्दल माहिती
अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना संबंधित महाविद्यालय व विद्यापीठाने घेतलेल्या प्रवेश परीक्षेत पात्रता असणे आवश्यक आहे.
नोंदणी फॉर्म संबंधित माहिती महाविद्यालय किंवा विद्यापीठांच्या अधिकृत संकेत स्थळावर म्हणजेच वेबसाईट वर जारी केल्या जाते. शेवटच्या तारखेपूर्वी विद्यार्थ्यांना नोंदणी पोर्टल वॉर ऑनलाईन अर्ज जमा करायचा असतो. काही महाविद्यालये अंतिम निवडीसाठी समुपदेशन किंवा जीडी आणि पीआय देखील घेतात.
फार्म डी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विविध महाविद्यालये व विद्यापीठांनी घेतलेल्या एनएमआयएसईई (NMISEE), जीपीएटी (GPAT) , एमईटी (MET), बीव्हीसीईटी (BVCET), एसआरएमजेई (SRMJEE) सारख्या प्रवेश परीक्षणाद्वारे नियमित केल्या जाते, तसेच ह्या परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे आहे.
फार्म डी अभ्यासक्रम साठी सरासरी फी 6,00,000 लाख रुपये ते 20,00,000 रु. पर्यंत असते तरीही ह्या आकड्यावर भौगोलिक स्थान आणि महाविद्यालय किंवा विद्यापीठांद्वारे उपलब्ध अभ्यासक्रमांनुसार बदलते.
कार्यक्रमात प्रवेश निश्चित करण्यासाठी उमेदवारांनी राष्ट्रीय पातळीवर किंवा विद्यापीठ स्तरावरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते हे आपण समजून घेतलेच आहे तर आता जाणून घेऊया ह्या परीक्षांबाबत आणखी माहिती.
अभ्यासक्रमाच्या मजकूर
शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये बी. फार्म म्हणजे फार्मसी मध्ये पदवी शिक्षणासारख्याच विषयांचा समावेश आहे, त्याव्यतिरिक्त फार्मसी क्षेत्रातील घटकांवर हॉस्पिटल फार्मसी संबंधित प्रशिक्षण, कम्युनिटी फार्मसी चे मूलभूत घटक, संशोधनाचे घटक आणि तसेच विष विज्ञान संबंधित प्रशिक्षणावर जोर देण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, अभ्यासक्रमाच्या पाचव्या वर्षाला उमेदवाराला सहा महिन्यांकरिता प्रकल्पाचे काम देखील करावे लागते.
सहाव्या वर्षी, इंटर्नशिप सोबत सहा महिन्यांसाठी प्रकल्पाचे काम देखील करावे लागते. संशोधनात्मक स्वरूप असणाऱ्या प्रकल्पाचा विषय, कार्यपद्धती, लागणारे संसाधन, मार्गदर्शन इत्यादी साठी, उमेदवारांना अभ्यासक्रम शिक्षकांपैकी एक शिक्षक नेमून देण्यात येतो, ह्या पद्धतीने उमेदवारांना आपले संशोधन प्रकल्पाला अमलात आणण्यासाठी मदत होते.
भविष्यातील संधी
पूर्ण झाल्यानंतर आणि अभ्यासक्रमा च्या दरम्यान फार्म डी उमेदवार दवाखान्यात क्लिनिकल फार्मसी मध्ये सेवा देऊ शकतात, तसेच क्लिनिकल रिसर्च संस्थांनमध्ये (सीआरओ),फार्माकोविजिलेन्स,फार्माको-अर्थशास्त्र , समुदाय (कम्युनिटी) सेवा, संशोधन आणि शिक्षणशास्त्र अशा अनेक क्षेत्रात काम करू शकणार आहे.
ह्या अभ्यासक्रमाच्या नंतर च्या जॉब प्रोफाइल मध्ये
फार्म दि पदवी धारकांना औषधनिर्माण संस्थांच्या अनुसंधान व विकास, उत्पादन विकास, तांत्रिक आणि विपणन विभागात संधी मिळतात. काही शीर्ष फार्मसी कंपन्या आहेत:
ल्युपिन, फायझर, सिप्ला, AbbVie, पिरामल, जॉन्सन आणि जॉन्सन, सन फार्मास्युटिकल्स, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन GSK, ऑरोबिंडो फार्मा, अॅमजेन, डॉ रेड्डीज लॅब, मायलन फार्मास्युटिकल्स इंक, झायडस कॅडिला, वॉलग्रीन फार्मसी, ग्लेनमार्क फार्मा, सनोफी, अॅबॉट लॅबोरेटरीज आणि बऱ्याच आणखी संस्था देखील.
तर हि होती फार्म डी बाबत ची माहिती अभ्यासक्रमाची, प्रवेश परीक्षा, प्रवेश परीक्षेची तयारी, पात्रता आणि भविष्यातील संधी सुद्धा. आम्ही अशा करतो तुम्ही तुमचे शैक्षणिक निर्णय व्यवस्थित विचार करून घ्याल आणि यशस्वी परिणामांचा आनंद घ्याल.
Also read: (D Pharmacy Course Information in Marathi)