आज आपण जाणून घेणार आहोत CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी ( Company Secretary ) विषयी. नक्की काय असत हे कंपनी सेक्रेटरी. कसा घ्यायचा प्रवेश . विषय कोणते असतात. हे सर्व जाणून घेणार आहोत.
भारतातील कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) ही कंपनी सचिवांचा ( Company Secretary ) व्यवसाय विकसित आणि नियमन करणारी एकमेव मान्यता प्राप्त व्यावसायिक संस्था आहे.
CS मध्ये पदवी मिळवण्यासाठी तुम्हाला तीन परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. पहिले CSEET नंतर एक्झिक्युटिव्ह, नंतर प्रोफेशनल परीक्षा पास झाल्यावर तुम्ही CS होता.
CSEET
CS मध्ये पहिले फाऊंडेशन परीक्षा घेतली जायची त्या परीक्षेच्या जागी २०२० पासून नवीन प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. तिचे नाव आहे CS Executive Entrance Test . ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर तुम्ही CS एक्झिक्युटिव्ह परीक्षे साठी पात्र होता.
जर तुम्ही बारावी पास असाल किंवा बारावीचे देणार असाल तर तुम्ही CSEET साठी प्रवेश घेऊ शकता. CSEET मध्ये तुम्हाला चार पेपर द्यावे लागतील प्रत्येक पेपर ५० गुणांचा असेल. हे सर्व पेपर बहुपर्यायी प्रश्नांचे असतील व ते संगणकाचा मार्फत घेतले जातील . पेपर नम्बर चार मध्ये तुम्हाला ३० गुणांची Online Viva Voce सामील असेल. व उरलेल्या २० गुण Current affairs ला असतील.
CSEET परीक्षेतील विषय
Paper 1 : Business Communication (50 marks)
Paper 2 : Legal Aptitude and Logical Reasoning (50 marks)
Paper 3 : Economic and Business Environment (50 marks)
Paper 4 : Current Affairs, Presentation and Communication Skills (Viva Voce) (50 marks)
CSEET उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक पेपर मध्ये ४०% गुण व एकूण ५०% गुण मिळवावे लगत्यान नंतर तुम्ही CS एक्झिक्युटिव्ह परीक्षे साठी पात्र होता.
CS एक्झिक्युटिव्ह ( Executive )
नवीन अभ्यसक्रमानुसार CS एक्झिक्युटिव्ह परीक्षे साठी पात्र होण्यासाठी तुम्हाला CSEET उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. जुन्या अभ्याक्रमात तुम्हीं जर ग्रज्युएट असाल तर तुम्हाला CS एक्झिक्युटिव्ह मध्ये डायरेक्ट प्रवेश मिळायचा किंवा जर तुम्हीं CMA / CA फाऊंडेशन उत्तीर्ण असाल तर तुम्ही CS एक्झिक्युटिव्ह ला पात्र होता पण नवीन अभ्यासक्रानुसार तुम्हाला CS एक्झिक्युटिव्ह ला पात्र होण्यासाठी CSEET देणे अनिवार्य असेल.
जर तुम्हीं CMA / CA ची फायनल परीक्षा उत्तीर्ण असेल तर तुम्हाला CSEET पासून सुट मिळेल तुम्हीं डायरेक्ट CS एकझिक्युटिव्ह परीक्षेला प्रवेश घेऊ शकता.
CS एक्झिक्युटिव्ह परीक्षे मध्ये तुम्हाला आठ पेपर द्यावे लागतात हे दोन Module मध्ये विभाजित केले आहेत.
Module – 1
1. Jurisprudence, Interpretation & General Laws
2. Company Law
3. Setting up of Business Entities and Closure
4. Tax Laws
Module – 2
5. Corporate & Management Accounting
6. Securities Laws & Capital Markets
7. Economic, Business and Commercial Laws
8. Financial and Strategic Management
CS एक्झिक्युटिव्ह मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक पेपर मध्ये ४० % व प्रत्येक module मध्ये ५० % गुण मिळवणे आवश्यक असते.
CS प्रोफेशनल ( Professional )
CS एक्झिक्युटिव्ह परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला २४ महिन्या साठी आर्टिकल शिप करावी लागते त्या नंतर तुम्हीं CS प्रोफेशनल परीक्षे साठी पात्र ठरता. CS प्रोफेशनल परीक्षे मध्ये तुम्हाला तीन Module आहेत प्रत्येक Module मध्ये तीन पेपर आहेत तर एक पेपर Elective असतो त्या मध्ये तुम्हाला आठ विषयातून एक विषय निवडायचा असतो. त्या विषया साठी ओपन बुक परीक्षा असते. असे तुम्हाला नऊ पेपर द्यावे लागतात.
Module 1
1. Governance, Risk Management, Compliances and Ethics
2. Advanced Tax Laws
3. Drafting, Pleadings and Appearances
Module 2
4. Secretarial Audit, Compliance Management and Due Diligence
5. Corporate Restructuring, Insolvency, Liquidation & Winding-up
6. Resolution of Corporate Disputes, Non-Compliances & Remedies
Module 3
7. Corporate Funding & Listings in Stock Exchanges
8. Multidisciplinary Case Studies (The examination for this paper will be open book examination)
9.Electives 1 paper out of below 8 papers (The examination for this paper will be open book examination)
- 9.1 Banking – Law & Practice
- 9.2 Insurance– Law & Practice
- 9.3 Intellectual Property Rights– Laws and Practices
- 9.4 Forensic Audit
- 9.5 Direct Tax Law & Practice
- 9.6 Labour Laws & Practice
- 9.7 Valuations & Business Modelling
- 9.8 Insolvency – Law and Practice
CS प्रोफेशनल परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नंतर तुम्हीं कंपनी सेक्रेटरी ही पदवी मिळते व तुमचा नावा समोर CS असे प्रिफिक्स लागते.
प्रॅक्टिसमधील कंपनी सेक्रेटरी पुढील सेवा देतात: –
- लीगल, सेक्रेटरीअल आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स
- कॉर्पोरेट पुनर्गठन
- विदेशी सहयोग आणि संयुक्त उद्यम
- लवाद आणि सामंजस्य-प्रकल्प वित्तपुरवठा
- वित्तीय व्यवस्थापन
- प्रकल्प नियोजन
- भांडवल बाजार आणि गुंतवणूकदार संबंध
- देय परिश्रम
- कॉर्पोरेट सल्लागार सेवा.
- कर सल्लागार सेवा
- विक्री कर ऑडिट आणि प्रतिनिधित्व ऑर्डर विक्री कर सुविधा (बर्याच राज्यात)