CMA म्हंजे Cost and Management Accountant ही संसदेच्या कायद्यानुसार कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स कायदा १९५९ च्या अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था.
CMA मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुमचा कडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे बारावी पास झल्यानंतर फाऊंडेशन मध्ये प्रवेश घेणे . व दुसरा पर्याय आहे डायरेक्ट प्रवेश त्याबद्दल आपण खाली सविस्तर रीत्या जाणून घेणार आहोत.
CMA Foundation
जर तुम्हीं बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही CMA फाऊंडेशन ला प्रवेश घेऊ शकता. त्यासाठी तुम्हीं कोणतीही शाखेतून बारावी पूर्ण केली असेल यावर बंधन नाही . ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते जून मध्ये व डिसेंबर मध्ये. तुम्ही ३१ जुलै च्या आगोदर डिसेंबर परीक्षे साठी तर ३१ जानेवारी आगोदर जून परीक्षे साठी प्रवेश घ्यावा लागतो.
तुम्ही प्रवेश इन्स्टिट्यूट च्या चॅप्टर ऑफिस मध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने प्रवेश घेऊ शकता तर ICMAI च्या ऑफिसियल संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन प्रवेश घेऊ शकता . फाऊंडेशन परीक्षे साठी तुम्हाला ४००० रुपय प्रवेश फी आहे.
तुम्हाला CMA फाऊंडेशन मध्ये चार पेपर द्यायचे असतात.
Paper 1 Fundamentals of Economics & Management (१०० Mark )
Paper 2 Fundamentals of Accounting (१०० mark)
Paper 3 Fundamentals of Laws and Ethics (१०० mark)
Paper 4 Fundamentals of Business Mathematics & Statistics (१०० mark)
CMA फाऊंडेशन उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक पेपर मध्ये ४० गुण तर . चार पेपर चे मिळून २०० गुण मिळवावे लागतात. CMA फाऊंडेशन उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही CMA इंटर ला प्रवेश घेऊ शकता.
CMA Inter
फाऊंडेशन उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला इंटर ला प्रवेश मिळतो . किंवा तुम्हीं डायरेक्ट प्रवेश घेऊ शकता त्याबद्दल आपण खाली जाणून घेणार आहोतच .
इंटर मध्ये ही तुम्ही फाऊंडेशन सारख्याच वर्षातून दोन वेळा परीक्षा देऊ शकता. आणि जून परीक्षे साठी तुम्हाला ३१ जनानेवरी आगोदर प्रवेश घ्यवा लागतो तर डिसेंबर परीक्षे साठी ३१ जुलै आगोदर प्रवेश घ्यावा लागतो.
CMA इंटर साठी २०००० रुपये फी आहे ती आपण दोन टप्प्यांत भरू शकतो पहिल्यांदा १२००० प्रवेश घेण्याच्या वेळी व नंतर ८००० रुपये जून परीक्षे साठी तुम्हाला ३१ जनानेवरी आगोदर भरावे लागतात तर डिसेंबर परीक्षे साठी ३१ जुलै आगोदर भरावे लागतात.
इंटर परीक्षेत आठ पेपर हे दोन ग्रुप मध्ये विभागात केले आहेत. फाऊंडेशन परीक्षे सारखेच इंटर परीक्षेत सुधा एक ग्रुप पास होण्यासाठी त्या ग्रुप मध्ये २०० व प्रत्येक विषयात ४० गुण मिळवावे लागतात.
CMA इंटर परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला फायनल परीक्षा देण्या आधी तुम्हाला १५ महिन्याची प्रॅक्टिकल ट्रेनिंग (आर्टिकल शिप) पूर्ण करावी लागते . त्यानंतर तुम्ही फायनल परीक्षे साठी पात्र होता. ICMAI चे सदस्यता मिळवण्या साठी तुम्हाला ३ वर्षाची आर्टिकल शिप पूर्ण करावी लागते. तीन वर्षा पैकी राहिलेली आर्टिकल शिप ही फायनल परीक्षा पास झाल्यावर करावी लागते. जर तुम्हाला सदसत्व नसेल पाहिजे तर तुम्ही फायनल परीक्षे नंतर डायरेक्ट जॉब सुधा करू शकता.
CMA Final
इंटर परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर तुम्ही फायनल परीक्षे साठी पात्र होता. फायनल परीक्षे देखील इंटर परीक्षे प्रमाणे दोन ग्रुप व आठ पेपर असतात. त्यांची उत्तीर्ण होण्यासाठीचे नियम देखील सारखेच असतात. फी च म्हणाल तर फायनल परीक्षे साठी तुम्हाला १७००० रुपये फी भरावी लागते . फी भरण्यासाठी ची शेवटची तारीख ही इंटर व फाऊंडेशन परीक्षे सारखीच असते.
फायनल परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तुम्ही तुमच्या नावा समोर CMA असे लावू शकता.
CMA डायरेक्ट प्रवेश
जर तुम्हीं कोणतीही शाखेतून ग्रॅज्युएशन उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही CMA इंटर ला प्रवेश घेऊ शकता.
तुम्हाला फाऊंडेशन परीक्षा द्यावी लागणार नाही. आणि जर तुम्ही इंजिनिअरिंग चे दुसरे वर्ष उत्तीर्ण असाल तर तुम्ही डायरेक्ट CMA इंटर परीक्षेला प्रवेश घेऊ शकता.
Passing Percentage
फाऊंडेशन परीक्षेसाठी ७० ते ७५ टक्के
इंटर परीक्षेसाठी १० ते २० टक्के
फायनल परीक्षेसाठी १२ ते २२ टक्के आहे.
माझे ग्रॅज्युएशन पूर्ण करताना मी फाउंडेशन परीक्षेचा प्रयत्न करू शकतो का?
होय आपण हे करू शकता.