BE म्हणजे नेमकं काय? 12 वी सायन्स नंतर इंजिनियरींग करायचीय? इंजिनियर कसे व्हायचे? इंजिनियरींग नंतर मला जॉब भेटेल का? इंजिनियरींग पुर्ण करायला मला किती खर्च येइल. हे प्रश्न पडलेत? खाली या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटणार आहेत.
इंजिनियरींग करायची हे खुप विदयार्थांचं स्वप्न असतं. बरेच विदयार्थी दहावी झाली की लगेच इंजिनियरींग प्रवेश परीक्षेच्या तयारीला लागतात.
काही विदयार्थांना आय.आय.टी मध्ये ऍडमिशन भेटावे असे वाटते तर काही लोक सी.वो.इ.पी चे स्वप्न पाहतात.
- BE/बी.टेक कोर्स काय आहे? (BE course information in Marathi)
- इंजिनियरींग डीग्रीसाठी मी पात्र आहे का?
- इंजिनियरींगला प्रवेश घेण्यासाठी मी कोणती प्रवेश परीक्षा दयावी?
- इंजिनियरींगला प्रवेश घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे?
- इंजिनियरींग डीग्री करण्यासाठी कीती खर्च येतो?
- मला इंजिनिरींग डीग्री कोर्स मध्ये काय शिकवले जाईल?
- इंजिनियरींग केल्यावर मला जॉब भेटेल का?
- मी इंजिनियरींग करतांना पार्ट टाइम जॉब करू शकतो का?
BE/बी.टेक कोर्स काय आहे? (BE course information in Marathi)
BE/बी.टेक कोर्स हया इंजिनिरींग डिग्री कोर्स पुर्ण झाल्यावर तुम्हाला प्रदान केलेली पदवी आहे.
काही लोकांच्या मनात एक गैरसमज असतो की गव्हर्नमेंट कॉलेज मधुन इंजिनियरींग केली की इंजिनियरींगची बी.टेक डीग्री भेटते आणि खाजगी कॉलेज मधुन केली की इंजिनियरींगची BE डीग्री भेटते. पण असे काही नाही. हा फक्त एक गैरसमज आहे.
काही कॉलेज BE डीग्री देतात आणि काही कॉलेज बी.टेक. तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे ते कॉलेज कोणती डीग्री देते याची चौकशी तुम्ही त्या कॉलेजला जावुन करू शकता किंवा कॉलेजच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता.
इंजिनियरींग डीग्रीसाठी मी पात्र आहे का?
इंजिनियरींग डीग्रीसाठी पात्र असण्यासाठी तुमचे एकतर 12 वी सायन्स पुर्ण झालेले पाहीजे किंवा तुमचा डीप्लोमा पुर्ण झालेला पाहीजे.
जर तुमचा डीप्लोमा पुर्ण झालेला असेल तर तुम्हाला इंजिनियरींगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश भेटतो.
जर तुमची 12 वी सायन्स ह्या साइड मधुन पुर्ण झालेली असेल तर तुम्हाला पहिल्या वर्षाला प्रवेश भेटतो.
12 वी नंतर प्रवेश घेण्यासाठी अटी खालिलप्रमाणे आहेत –
इंजिनियरींगला प्रवेश घेण्यासाठी मी कोणती प्रवेश परीक्षा दयावी?
इंजिनियरींगला ऍडमिशन घेण्यासाठी भरपूर प्रवेश परीक्षा आहेत. पण जर तुम्हाला महाराष्ट्रा मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही MHT-CET ही प्रवेश परीक्षा देणे गरजेचे आहे.
जर तुम्ही JEE Mains ही प्रवेश परीक्षा दिलेली असेल तरीही तुम्ही हया परीक्षेव्दारे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही इंजिनीरिंग कॉलेजला प्रवेश घेवु शकता.
पण हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की JEE च्या स्कोर वर खुप लिमिटेड सिटस् वर ऍडमिशन होते.
महाराष्ट्रामध्ये कोणत्याही इंजिनियरींग कॅालेजला प्रवेश घेण्यासाठी परीक्षा –
बिरला सारखे कॉलेज त्यांच्या स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतात. बिरला इन्स्टीटयुट मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला BITSAT ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
इंजिनियरींगला प्रवेश घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे?
- तुमची सर्वात आधी प्रवेश परीक्षा होते.
- प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर त्याबरोबर तुमचा रॅंक पण तुम्हाला क्ळतो.
- त्या रॅंकच्या आधारे कॅप राउंड होतात.
- कॅप राउंड चा फॉर्म भरतांना तुम्हाला कोणते कॉलेज पाहीजे, कोणती स्ट्रीम पाहीजे याचा तुमच्याकडून एक ऑपशन फॉर्म भरून घेतला जातो.
- कॅपचे 3 राउंड होतात.
- जेव्हा तुम्ही कॅप मध्ये लागलेले कॉलेजची निवड करता, तेव्हा तुम्हाला कॉलेजला जावुन ऍडमिशन घ्यावे लागते.
इंजिनियरींग डीग्री करण्यासाठी कीती खर्च येतो?
इंजिनियरींग कॉलेजची फी एका वर्षाची सरासरी 1,10,000 इतकी असते.
जर तुम्ही घरून इंजिनियरींग करत असाल तर तुम्हाला एका वर्षाचा एवढा खर्च येइल:
कॉलेज फि | 1,10,000 /- |
पुस्तके | 4,000 /- |
कॉलेजसाठी लागणाऱ्या इतर वस्तू | 2,000 /- |
कॉलेज युनिफॉर्म | 2,000 /- |
एक्झाम फि | 1,000 /- |
इतर | 1,000 /- |
एकूण | 1,20,000 /- |
जर तुम्ही घरापासुन लांब कुठेतरी हॉस्टेल वर राहुन कॉलेज करणार असाल तर तुमचा वार्षिक खर्च वरचे 1,20,000 धरून असा असेल:
1,20,000 /- | |
हॉस्टेल फि (3,000 x 12) | 36,000 /- |
मेस फि (4,000 x 12) | 48,000 /- |
इतर खर्च | 20,000 /- |
एकूण | 2,24,000 /- |
टीप: वरील खर्च सरासरी मोजलेला आहे. तुम्ही कुठून कॉलेज करत आहात त्याप्रमाणे हा खर्च कमी किंवा जास्त लागू शकतो याची नोंद घ्यावी.
मला इंजिनिरींग डीग्री कोर्स मध्ये काय शिकवले जाईल?
इंजिनिरींग डीग्री कोर्स हा 4 वर्षांचा कोर्स आहे. इंजिनियरींगला सेमिस्टर पॅटर्न follow करतात. एक सेमिस्टर 6 महिन्यांचा असतो. म्हणजे 4 वर्षांत तुम्हाला 8 सेमिस्टर असतात.
या 4 वर्षांत खुप काही गोष्टी शिकवल्या जातात. वेगवेगळया ब्रांचेसला वेगवेगळया गोष्टी शिकवल्या जातात.
काही इंजिनियरींगच्या ब्रांचेस आहेत:
4 वर्षांमध्ये तुमचे:
इंजिनियरींग केल्यावर मला जॉब भेटेल का?
हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल कारण सगळे आजकाल हेच म्हणतात की खुप लोक इंजिनियर झालेत, इंजिनियरला जॉब नाहीत, इत्यादी…
पण हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की जर क्वालिटी असली तर जॉब भेटतोच.
आणि इंजिनियरची खुप जास्त मागणी आहे मोठ्या कंपन्यांमध्ये.
जर जॉब कमी असते तर का बऱ्याच कॉलेज मधल्या 70 टक्के पेक्षा जास्त मुलांना जॉब भेटतात? हो, काही कॉलेज मध्ये नाही भेटत जॉब कारण त्या कॉलेजचे प्लेसमेंट सेल विदयार्थांना जॉब देण्यास सक्षम नसते.
पण प्रवेश घ्यायच्या आधी जर तुम्ही कॉलेजचे प्लेसमेंट रेकॉर्डस् पाहीले आणि मग प्रवेश घेतला तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येणारच नाही.
प्रवेश घेतांना मुळात अशा कॉलेज मध्ये प्रवेश घ्या ज्या कॉलेजचे प्लेसमेंट सेल विदयार्थांना जॉब मिळवुन देऊ शकते.
मी इंजिनियरींग करतांना पार्ट टाइम जॉब करू शकतो का?
खरं सांगायचं म्हटलं तर हो तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकता. पण इंजिनीरिंगचे प्रॅक्टीकल्स, viva, आणि खुप साऱ्या परीक्षा, या मध्ये जर तुम्ही जॉब करणार असाल तर तुमचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची खुप शक्यता असते.
पण यावर एक उपाय आहे, तुम्ही फ्रीलांन्सीग किंवा ब्लॉगिंग करू शकता. हया दोन्ही गोष्टी तुम्ही तुम्हाला मोकळा वेळ भेटेल तेव्हा करू शकता.
जबरदस्त माहिती सर..