मित्रांनो? आपल्या जीवनामध्ये अन्न, वस्त्रा आणि पाणी यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्यासोबतच शिक्षणाला देखील अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे कोर्स किंवा डिग्री आहेत. प्रत्येक जण आपल्या इच्छेनुसार कोर्स निवडत असतो व त्यामध्ये आपले करिअर करत असतो परंतु आपल्यातील खूप कमी जणांना एम एस डब्ल्यू या कोर्स बद्दल माहिती आहे. म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही MSW full form in Marathi आणि एम एस डब्ल्यू म्हणजे काय? घेऊन आलो.
MSW full form in Marathi:
MSW चा इंग्रजी अर्थ “Master of social work” असा होतो तर, MSW full form in Marathi ” समाज कार्याची पदवी” असा होतो.
एम एस डब्ल्यू म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क या मध्ये समाजकार्याच्या संबंधित सर्व घटकांचा अभ्यास होतो. एम एस डब्ल्यू हा साधारणता दोन वर्षाचा कोर्स आहे यामध्ये 4 सेमिस्टर असतात. आजच्या पिढीला पुस्तकी ज्ञानाला सोबतच समाजाशी जोडल्या जाणाऱ्या ज्ञानाचे शिक्षण देणे हे तितकेच गरजेचे आहे जितके की, पुस्तकी शिक्षण. त्यामुळे एम एस डब्ल्यू हा एक कोर्स आहे ज्यामध्ये आपल्याला समाज कार्य संबंधित सर्व ज्ञान दिले जाते. जर तुम्हाला समाज कार्यामध्ये विशेष रस असेल तर तुम्ही एम एस डब्ल्यू हा कोर्स निश्चितपणे करू शकता.
MSW बद्दल सविस्तर वाचा – MSW Course Information in Marathi
MSW म्हणजे काय?
MSW म्हणजेच ” master of social work” ज्याला मराठी भाषेमध्ये समाजकार्याची पदवी असे म्हटले जाते.
आजच्या काळामध्ये तुम्ही अनेक समाज कार्याच्या संबंधित संस्थांना ओळखत असाल चे कुठल्याही अडचणी च्या संबंधित मदत करण्यासाठी तत्पर राहतात. जर आपल्या समाजातील काही लोकांवर अत्याचार होत असेल तर त्यांना न्याय देण्यासाठी समाजकार्याची संस्था उभी असते. परंतु आपल्यातील खूप कमी जणांना हे माहिती नाही की, समाजकार्याची सेवा करण्यासाठी एक कोर्स सुद्धा उपलब्ध आहे तो म्हणजे एम एस डब्ल्यू.
जो विद्यार्थी एम एस डब्ल्यू या कोर्स चा अभ्यास करतो तो विद्यार्थी संपूर्ण रित्या एक सामान्य व्यक्तीची कुठल्याही प्रकारची मदत करण्यासाठी तयार असतो. या कोर्सचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना mentally मजबूत केले जाते. तसेच त्यांच्या out look कडे विशेष लक्ष दिले जाते. एम एस डब्ल्यू चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रकारे ज्ञान दिले जाते की एखादा विद्यार्थी संपूर्ण रूपाने समाज सेवा कार्यामध्ये तल्लीन हो शकतो किंवा समाजसेवेचे कार्य करू शकेल.
तसेच या कोर्समध्ये पारदर्शी होण्याचे प्रशिक्षण दिले जाते व नेहमी सकारात्मक विचार कसा ठेवावा हे देखील शिकवले जाते.
आपल्या समाजातील बहुतांशी लोक हे गरिबीमध्ये आणि लाचारी मध्ये आपले जीवन जगत आहेत. जे लोक एम एस डब्ल्यू किंवा समाजसेवा या संस्थाची जोडलेल्या असतात ते लोक समाजातील अशा गरीब लोकांची मदत करण्यासाठी उभे असतात.
त्यामुळे एम एस डब्ल्यू हे आपल्या समाजाला विकसित करण्यासाठी आणि समाजाची दशा बदलण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा फोर्स आहे.
MSW या कोर्स साठी आवश्यक या पात्रता:
एम एस डब्ल्यू हा साधारणत दोन वर्षाचा कोर्स ज्या मध्ये 4 सेमिस्टर असतात. एम एस डब्ल्यू या कोर्समध्ये प्रवेश घेण्याकरिता तुम्हाला विशेष पात्रता असणे आवश्यक आहे.
कुठल्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून कमीत कमी पन्नास टक्के गुणांसोबत पदवी असणे आवश्यक आहे.
तर मित्रांनो! “MSW full form in Marathi | एम एस डब्ल्यू म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा. धन्यवाद!