ED Full Form in Marathi | ईडी म्हणजे काय?

ED Full Form in Marathi – मित्रांनो! आपण बराच वेळा वर्तमानपत्र वाचत असताना येडी समाजाच्या बातम्या वाचत असतो जसे की, अमुक नेत्याला किंवा अधिकाऱ्याला ईडी ची नोटीस मिळाली. परंतु आपल्यातील बरेच जणांना नेमके ईडी म्हणजे काय किंवा ईडीची नोटीस म्हणजे काय याबद्दल माहिती नसते त्यामुळे असे व्यक्ती तिकडे दुर्लक्ष करतात.

त्यामुळे मित्रांनो आम्ही आजच्या लेखामध्ये ed Full from in Marathi आणि ईडी म्हणजे काय? त्या बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो.

ED Full Form In Marathi | What Is ED Meaning In Marathi:

ED चे पूर्ण रूप म्हणजे Enforcement Directorate आणि त्याला मराठीत अंमलबजावणी संचालनालय असे म्हणतात. ED ही केंद्र सरकारची एजन्सी आहे जी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (PMLA) सारख्या आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करते. ही एजन्सी बेकायदेशीर आर्थिक कामात गुंतलेल्या लोकांवर लक्ष ठेवते.

ईडीचा इतिहास आणि स्थापना –

अंमलबजावणी संचालनालयाची स्थापना 1956 मध्ये दिल्ली येथे करण्यात आली. परकीय चलन कायद्याची अंमलबजावणी करणे आणि आर्थिक फसवणुकीचा तपास करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट होते. यापूर्वी, ही एजन्सी केवळ परकीय चलन नियमन कायदा, 1947 (FERA) अंतर्गत कार्यरत होती. परंतु 1999 मध्ये FERA ची जागा घेण्यासाठी FEMA कायदा आला, त्यानंतर ED ने FEMA अंतर्गत काम करण्यास सुरुवात केली.

2002 मध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) लागू केल्यानंतर, ED ला अधिक अधिकार मिळाले, ज्याद्वारे ही एजन्सी मनी लाँडरिंग प्रकरणांची देखील चौकशी करते.

ईडी ची स्थापना करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे, –

  • फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, 1999 (FEMA)
  • प्रिवेंशन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट,2002 (PMLA)

वरील दोन कायद्यांचे उल्लंघन कुठल्याही क्षेत्रामध्ये होत असेल तर, त्या प्रकरणांमध्ये ईडी द्वारे तपासणी केली जाते. तसेच आर्थिक घोटाळे आणि पैशाचा गैरवापर करणाऱ्या लोकांविरोधात तपास करणे, अटक करणे, खटला दाखल करणे, मालमत्ता जप्त करणे असे विविध अधिकार ईडीला दिलेले आहेत.

आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी ईडी कडून सक्त कारवाई केली जाते.

तसेच आपल्या देशामध्ये चाललेला काळाबाजार, बेहिशेबी मालमत्ता, कर कर चुकवणे आणि पैशांमध्ये घोटाळी इत्यादी संबंधीचे सर्व तपास ईडी द्वारे घेतले जातात.
ईडी चे संचालनालय महसूल विभागाच्या अंतर्गत येते. आणि महसूल विभागाच्याच प्रशासकीय नियंत्रणाखाली ईडीचे सर्व कामकाज चालतात.

ED ची कार्ये आणि कर्तव्ये –

देशातील आर्थिक फसवणूक रोखणे, त्यांची चौकशी करणे आणि गरज पडल्यास लोकांवर कायदेशीर कारवाई करणे हे ईडीचे मुख्य काम आहे. या महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • मनी लाँडरिंगचा तपास – जर एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेवर मनी लाँड्रिंगचे आरोप असतील तर ईडी सविस्तर तपास करते.
  • बेकायदेशीर मालमत्ता जप्ती – पैसे बेकायदेशीरपणे कमावले गेले आहेत असे वाटल्यास कोणतीही बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार ED ला आहे.
  • परकीय चलन नियमांची अंमलबजावणी – FEMA अंतर्गत, परकीय चलन नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध ईडी कारवाई केली जाते.
  • गुन्हेगारीचे जाळे तोडणे – ED काहीवेळा मोठ्या गुन्हेगारी सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यास मदत करते, जे बेकायदेशीर पैशाचे काळ्या बाजारात प्रसार करून पांढऱ्या पैशात रूपांतर करतात.
  • आंतरराष्ट्रीय सहकार्य – जेव्हा मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक गुन्ह्यांमध्ये सीमापार सहभाग असतो तेव्हा ED आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांच्या एजन्सींना देखील सहकार्य करते.

ED चे कायदेशीर अधिकार –

ईडीला बरेच कायदेशीर अधिकार देण्यात आले आहेत ज्यामुळे ते मजबूत होते. ही एजन्सी संशयितांना थेट बोलावू शकते, त्यांची चौकशी करू शकते, त्यांची मालमत्ता जप्त करू शकते आणि त्यांना अटक देखील करू शकते. या एजन्सीचे काम न्यायपालिकेच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे कोणीही ईडीच्या निर्णयांना आव्हान देण्यासाठी न्यायालयात जाऊ शकते.

  • समन्स आणि प्रश्न – ईडी कोणत्याही व्यक्तीला किंवा कंपनीला बोलावू शकते आणि त्यांच्याकडून कागदपत्रे किंवा तपशीलांची मागणी करू शकते.
  • शोध आणि जप्ती – जर ईडीला असे वाटत असेल की बेकायदेशीर क्रियाकलाप सुरू आहेत, तर एजन्सी शोध वॉरंटद्वारे कोणत्याही ठिकाणी छापा टाकू शकते आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करू शकते.
  • अटक – एखादी व्यक्ती किंवा संस्था बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील असल्याचा ठोस पुरावा ईडीला आढळल्यास, ते त्यांना अटक करू शकतात.

ED अधिकारी नेमणूक:

पूर्वी ED मध्ये कार्यरत असणारे रिझर्व बँक मार्फत केली जात होती. पण सध्याच्या काळामध्ये ईडी महसूल विभागाच्या अंतर्गत काम करते. म्हणून ईडी महसूल विभागाच्या अंतर्गत असल्यापासून कस्टम, प्राप्तिकर विभाग, पोलीस आशा संस्थेतून ईडी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. ईडी मध्ये नेमणूक केलेले प्रत्येक अधिकारी हा निडर आणि निर्भय असतो. यातील अधिकार्‍यांवर कुठल्याही प्रकारचा दबाव नसतो.

ED च्या मर्यादा –

ईडीकडे अफाट अधिकार असले तरी, या एजन्सीलाही काही मर्यादा आहेत. जसे:

ही एजन्सी थेट कोणत्याही कोर्टात केस दाखल करू शकत नाही, म्हणून तिला केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) किंवा इतर एजन्सीमार्फत काम करावे लागेल.
ED ला अनेकदा आरोप होतात की एजन्सी राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि केवळ विशिष्ट लोकांवर कारवाई करते. परंतु, एजन्सीला न्यायपालिकेसमोर आपल्या कृतींचे समर्थन करावे लागेल.

तर मित्रांनो! “ED Full Form in Marathi” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments