मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये MPSC परीक्षेद्वारे विविध पदांची भरती केली जाते त्यातील एक पद म्हणजे बिडीओ हे आहे.
मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे बिडिओ म्हणजे काय ? आणि बिडिओ ला मराठी मध्ये काय म्हणतात.
BDO full form in Marathi:
BDO म्हणजेच ” Block Department Officer”. BDO full form in Marathi “गट विकास अधिकारी” असा होतो.
सामान्यतः गट विकास अधिकारी हे नाव आपण पंचायत समितीच्या संदर्भामध्ये ऐकलेले असेल.
जन विकासासाठी ज्या योजना लागू केल्या जातात त्या योजना बिडीओ म्हणजेच गट विकास अधिकारी यांच्यामार्फत लागू केल्या जातात.
बिडिओ अधिकारी यांचा मुख्य उद्देश आपल्या गटाचा विकास करणे हा असतो. तसेच गट विकास अधिकारी हे त्यांच्या अंतर्गत असलेल्या योजना या सुरळीतपणे पार पडतात की नाही याकडे लक्ष देतात. जिल्ह्यात असलेल्या प्रत्येक गटाचा विकास पाहण्याचे काम हे गट विकास अधिकारी याकडेच असते.
बिडीओ म्हणजे काय?
गट विकास अधिकारी हा शासनाचा ग्रामविकास खात्याचा अधिकारी असून त्याच्या अंतर्गत असलेल्या सर्व गटांच्या विकासाकडे तो लक्ष देतो. गट विकास अधिकारी हा राज्यशासन व पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.
जिल्ह्याच्या अंतर्गत जे काय काम होतात, development होतात, तसेच implementation साठी जो अधिकारी नेमला जातो त्याला BDO असे म्हणतात.
कोणत्याही क्षेत्राचे किंवा योजनेचे काम सुरू करायचे असेल तर BDO च्या अधिपत्याखालीच ते काम सुरू केले जाते. प्रत्येक योजनांमध्ये किंव्हा कार्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका हे गट विकास अधिकारी बजावत असतात.
गटविकास अधिकाऱ्यांची निवड ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी परीक्षा मार्फत केली जाते. गट विकास अधिकारी ह level-1 आणि level-2 या दर्जाचा अधिकारी असतात.
BDO ची कार्य:
BDO म्हणजेच ” गट विकास अधिकारी”. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो. त्याची कार्य पुढील प्रमाणे असतात.
- गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा अधिकारी असल्याने सर्व कागदपत्रे ही त्याच्या ताब्यात असतात. तसेच तो विकास कामांची अंमलबजावणी देखील करतो.
- पंचायत समितीच्या अनुदाना मधून रकमा काढणे आणि त्याचे वाटप करणे हे काम बिडिओचे असते.
- विकास कार्य व्यतिरिक्त शासनाच्या आदेशानुसार पंचायत समितीसाठी मालमत्ता ताब्यात घेणे व पंचायत समितीच्या मालमत्तेची विक्री करणे हे देखील गटविकास अधिकारी करतात.
- विस्तार अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे.
- पंचायत समितीच्या कार्याचा अहवाल वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकार्याचे कळविणे. तर मित्रांनो! “BDO full form in Marathi | बिडिओ म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!