मित्रांनो! आपल्या भारतामध्ये आलिकडच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेला अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहेत. आजच्या तरुण पिढीला नोकरी करण्यापेक्षा सरकारी नोकरी करणे अधिक पसंतीचे झाले आहेत त्यामुळे आजचा प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त करतो.
आजच्या लेखात आपण mpsc full form in Marathi आणि एमपीएससी म्हणजे काय? पाहणार आहोत.
भारतामध्ये यूपीएससी सर्वात मोठी स्पर्धा परीक्षा आहे. नंतर प्रत्येक राज्य आपापली अशी विशेष स्पर्धा परीक्षा घेतली जाते त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य मध्ये घेतली जाणारी मुख्य स्पर्धा परीक्षा म्हणजे एमपीएससीची परीक्षा होय.
MPSC Full Form in Marathi
स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एम पी एस सी चा फुल फॉर्म माहिती असणे गरजेचे आहे.
MPSC Full Form in Marathi – Maharashtra Public Service commission, याला मराठी भाषा मध्ये आपण ” महाराष्ट्र लोकसेवा आयोग” असे म्हणतो.
एम.पी.एस.सी म्हणजे काय?
Mpsc म्हणजेच “महाराष्ट्र लोकसेवा आयोग” होय. (MPSC Full Form in Marathi)
केंद्र सरकारच्या पातळीवर जशी यू.पी.एस.सीची (UPSC) परीक्षा घेतली जाते त्याप्रमाणे राज्य सरकारच्या पातळीवर म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या एम.पी.एस.सी (Mpsc) ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते.
Mpsc ही एक अशी संघटना आहे जी महाराष्ट्र शासना च्या दरम्यान वेगवेगळ्या पदांच्या भरती करिता स्पर्धा परीक्षा द्वारे घेतली जाते.
या परीक्षेद्वारे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या परीक्षा घेऊन वेगवेगळ्या पदांची भरती केली जाते. ज्याद्वारे प्रशासन, पोलीस, वन आणि अभियांत्रिकी अशा विविध पदांच्या विभागा मार्फत पात्र उमेदवारांची निवड केली जाते.
तसेच एमपीएससी या परीक्षा मार्फत गट-अ (level A) व गट-ब (level B) अशा पदांसाठी देखील निवड केली जाते.
एमपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा:
महाराष्ट्र राज्यात मध्ये घेतला जाणारा एमपीएससी या परिषदेत वेगवेगळ्या परीक्षा घेऊन विविध पदांची भरती केली जाते.
एमपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या काही परीक्षा पुढील प्रमाणे;
- राज्य सेवा परीक्षा- Maharashtra state service Examination
- महाराष्ट्र वनसेवा परीक्षा- Maharashtra Forest service Examination
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा- Maharashtra Agriculture service Examination
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-ब परीक्षा- Maharashtra Engineering service group B Examination
- सहाय्यक परीक्षा- Assistant Examination
- लिपिक टंकलेखक परीक्षा- Clerk Typist Examination
- राज्य कर निरीक्षक परीक्षा- state tax inspector Examination
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा- police sub inspector Examination
Mpsc परीक्षेसाठी आवशक्य पात्रता:
- UPSC परीक्षे प्रमाणेच एम.पी.एस.सी परीक्षा देण्याकरिता आपण प्रथमच हा भारतीय नागरिक असल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
- कोणत्याही शाखेतून पदवीधर असल्यास किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असाल तर आपणास या परिक्षेसाठी अर्ज नोंदणी करता येते.
- 19 वर्षे पूर्ण असलेला व कोणत्याही पदवीत्तर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेला उमेदवार एमपीएससी परीक्षा देण्याकरिता पात्र ठरतो.
- खुल्या गटातील उमेदवार वयाच्या 38 व्या वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात तर राखीव गटातील उमेदवार वयाच्या 40 वर्षापर्यंत एमपीएससीची परीक्षा देऊ शकतात.
Mpsc परीक्षेचे स्वरूप:
UPSC या स्पर्धा परीक्षा प्रमाणेच एम.पी.एस.सी परीक्षा देखील तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. Mpsc ची परीक्षा पूर्व परीक्षा (prelim exam), मुख्य परीक्षा (Mains) आणि मुलाखत (interview) या तीन टप्प्यांत मध्ये पूर्ण होते.
1. पूर्व परीक्षा (prelim exam):
एमपीएससीची पूर्वपरीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. यामध्ये एक प्रश्न विचारला जातो व त्या प्रश्नाचे उत्तरामध्ये चार पर्याय विचारले जातात व त्यातील एक पर्याय ह्या प्रश्नाचा उत्तर असतो.
पूर्वपरीक्षेसाठी 200 गुणांचे दोन पेपर असतात प्रत्येकी पेपर ला दोन तासांचा वेळ असतो. या पेपर मध्ये विचारलेले प्रश्न आहे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असतात.
2. मुख्य परीक्षा (Mains):
एमपीएससीच्या मुख्य परीक्षा मध्ये एकूण 6 पेपर घेतले जातात. एमपीएससी ची मुख्य परीक्षा ही 800 गुणांकरिता असते.
एकूण 6 पेपर पैकी 4 पेपर है सामान्य अध्ययनाचे असून बहुपर्यायी स्वरूपाचेअसतात. तसेच या मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम 3:1 असते. म्हणजेच तिनं चुकीच्या प्रश्नांच्या उत्तरा करिता एक मार्क काठला जातो. या पेपरसाठी दोन तासांची वेळ असते.
मुख्य परीक्षेतील राहिलेले दोन पेपर हे भाषा विषयाचे असतात. त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे विषय दीर्घोत्तर स्वरूपाचे असतात.
या पेपर मध्ये निबंध लेखन, अहवाल लेखन, उताऱ्यावरील प्रश्न, सारांश लेखन आणि व्याकरण विचारले जाते.
3. मुलाखत:
पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतो.
तर मित्रांनो! “MPSC Full Form in Marathi | एम.पी.एस.सी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा. धन्यवाद!