MBA म्हणजे काय? MBA Full Form in Marathi

या लेखात, मी तुम्हाला MBA बद्दल सर्वात सामान्यपणे विचारल्या जाणार्‍या प्रश्नांसह MBA Full Form in Marathi समजावून सांगणार आहे. जर तुम्हाला नोकरी करण्याऐवजी पदवीनंतर अभ्यास करायचा असेल तर तुमच्याकडे एक अतिशय लोकप्रिय पर्याय आहे – MBA. एमबीए मॅनेजमेंट क्षेत्रात नोकरीच्या संधी देते आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी ह्या कोर्सला पसंती देतात. तुम्ही कुठलेही ग्रॅज्युएशन केले तरी तुम्ही एमबीए करू शकता. जेव्हा तुम्ही MBA ला प्रवेश घ्याल तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमचे वर्गमित्र अभियांत्रिकी, वाणिज्य, वैद्यकीय, फार्मसी, नर्सिंग इत्यादी विविध क्षेत्रांतून आलेले आहेत. जेव्हा कोणीतरी तुम्हाला म्हणतो – अरे, MBA हा  तुझ्यासाठी चांगला पर्याय आहे तेव्हा MBA Full Form in Marathi काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल.

mba full form in marathi, mba meaning in marathi

MBA चे पूर्ण रूप काय आहे? (MBA Full form in Marathi)

MBA Full FormMaster of Business Administration
MBA Full Form in Marathi, MBA Meaning in Marathiव्यवसाय प्रशासनाचा मास्टर

जर आपण एमबीएचे पूर्ण स्वरूप विभागले तर ते आपल्याला दोन शब्द देतात – मास्टर्स आणि Business Administration. या दोन्ही शब्दांकडे बारकाईने नजर टाकूया आणि त्यांना स्पष्टपणे समजून घेऊ या.

  • Masters – एमबीएचे पूर्ण स्वरूप स्पष्टपणे सांगते कि एमबीए ही व्यवसाय प्रशासनातील मास्टर्स पदवी आहे. आपण मास्टर्स पदवी दर्शविण्यासाठी पदव्युत्तर (Post Graduate) पदवी हा शब्द देखील वापरतो.
  • Business Administration – Business Administration/व्यवसाय प्रशासन हा व्यवसाय/संस्थेतील संसाधने, वेळ आणि लोकांच्या व्यवस्थापनासाठी वापरला जाणारा शब्द आहे.

MBA म्हणजे काय? MBA Meaning in Marathi

एमबीए हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे जो पदवीनंतर करता येतो. एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही डीटीई किंवा तुम्ही ज्या संस्थेत प्रवेश घेत आहात त्या संस्थेने ठरवून दिलेले पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत. तुमची पदवी आणि तुमच्या करिअरच्या उद्दिष्टांवर अवलंबून एमबीएऐवजी तुम्ही इतर काही कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकता. एमबीए मध्ये तुम्हाला वेगवेगळी कौशल्ये शिकवली जातात ज्यामुळे तुम्हाला कोर्स पूर्ण झाल्यानंतर चांगली नोकरी मिळण्यास मदत होईल. एमबीए कोर्स दरम्यान तुम्हाला इंटर्नशिप करणे देखील आवश्यक आहे. एमबीए नंतर तुम्ही पुढील शिक्षण देखील घेऊ शकता. एमबीए नंतर नोकरीच्या विविध संधी आहेत.

एमबीए कोर्सचे प्रकार कोणते?

तुम्ही एमबीए कोर्स ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन प्रकारे करू शकता. आता महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांद्वारे ऑनलाइन एमबीए प्रदान केले जाते. ऑनलाइन एमबीए मध्ये तुम्ही ऑनलाइन व्याख्यानांना उपस्थित राहता आणि प्रॉक्टोर केलेल्या परीक्षांना उपस्थित राहता. ऑफलाइन एमबीएसाठी तुम्ही प्रवेश घेता आणि तुमच्या कॉलेज मध्ये लेक्चरला जाऊन क्लासेसला हजेरी लावता. ऑफलाइन एमबीएसाठी तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये परीक्षेला उपस्थित राहता.

MBA साठी प्रवेश कसा घेतला जातो?

MBA ला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला खालील प्रक्रिया फॉलो करावी लागेल –

  • तुम्ही एमबीएला प्रवेश घेण्यास पात्र आहात की नाही हे आधी तपासून पहा. पात्रता निकष डीटीई द्वारे किंवा युनिव्हर्सिटी द्वारे ठरवले जातात आणि जर तम्ही पात्र नसाल तर तुम्ही एमबीएसाठी प्रवेश घेऊ शकत नाही.
  • तुम्ही पात्र असल्यास तुम्ही प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरले पाहिजेत.
  • प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम तपासा आणि परीक्षेचा अभ्यास करा. शक्य तितक्या प्रश्नांचा सराव करा. तुम्हाला चांगले कॉलेज मिळविण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळवण्याचे ध्येय ठेवावे. लक्षात ठेवा, अधिक गुण म्हणजे तुमच्या इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची अधिक शक्यता.
  • प्रवेश परीक्षेला उपस्थित राहा आणि निकालाची प्रतीक्षा करा. तुम्ही एमबीए महाविद्यालये आणि त्यांच्या मागील वर्षांच्या कटऑफचे संशोधन करू शकता जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणत्या महाविद्यालयांमध्ये किती कट ऑफ आहे.
  • निकाल जाहीर झाल्यावर तुम्हाला समजेल की तुम्ही कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकता.
  • CAP फेऱ्या सुरू होण्याची प्रतीक्षा करा. एकदा CAP फेऱ्या सुरू झाल्या की, तुमचा फॉर्म भरा आणि तुमची इच्छित महाविद्यालये तिथे टाका.
  • एकदा CAP राउंड लिस्ट जाहीर झाल्यावर तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणते कॉलेज मिळाले आहे. तुमच्याकडे निवडण्यासाठी दोन पर्याय आहेत – Betterment आणि Freeze. बेटरमेंट म्हणजे तुम्हाला सध्याची सीट ठेवायची आहे पण तुम्ही तुमच्या यादीतील उच्च महाविद्यालयांसाठी प्रयत्न करू इच्छिता. फ्रीज म्हणजे तुम्हाला नियुक्त केलेल्या कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश निश्चित करायचा आहे. तुम्हाला मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला फ्रीझ पर्याय निवडावा लागेल.
  • महाविद्यालयात जाऊन फी भरून प्रवेश निश्चित करा.

[snippet]

तुम्ही एमबीए कोर्स करू शकता की नाही हे समजून घेण्यासाठी विविध घटकांचा विचार केला जातो जसे की – पात्रता, प्रवेश परीक्षांची माहिती, प्रवेश प्रक्रिया, त्यासाठी किती खर्च येईल, इत्यादी. मी यावर दुसरा लेख लिहिला आहे जो तुम्हाला हि सगळी माहिती सोप्प्या भाषेत देईल. तुम्ही तो लेख इथे वाचू शकता – MBA Information in Marathi.

[/snippet]

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments