बीएएमएस कोर्सेची माहीती | BAMS Course Information in Marathi

BAMS Course Information in Marathi

bams हा 5.5 वर्षाचा एक मेडीकल अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे. BAMS म्हणजे बॅचलर ऑफ आर्युवेदा मेडीकल अँड सर्जरी कोर्सचा अभ्यासक्रम वैदयकीय क्षेत्राचा पारंपारीक आणि आधुनिक या दोन्ही बाबींवर केंद्रीत आहे.

खालिल विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहेत:

  • पारंपारिक आयुर्वेद
  • आधुनिक वैदयकीय प्रणाली
BAMS Information in Marathi
BAMS Information in Marathi

BAMS कोर्सची प्रवेश प्रक्रिया काय आहे? BAMS कोर्सेला प्रवेश घेण्यासाठी मी पात्र आहे का?

  • BAMS कोर्सला प्रवेश घेण्यसाठी तुम्ही बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि तुम्ही फक्त बारावी विज्ञान नंतर BAMS कोर्सला प्रवेश घेऊ शकता.
  • बारावीत तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असणे आवश्यक आहे आणि हया तिन्ही विषयांचा अग्रेगेट स्कोर 50 टक्के पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • BAMS कोर्सची प्रवेश प्रक्रीया प्रवेश परीक्षेच्या आधारे होते. तुम्हाला NEET ही प्रवेश परीक्षा दयावी लागते.
  • प्रवेश परीक्षा दिल्यावर तुमचा रिझल्ट डीक्लेर होतो. रिझल्ट डीक्लेर झाल्यावर तुम्ही कॉन्सलिंग राउंडला बसु शकता.
  • सीट अलॉटमेंट ची प्रक्रीया पुर्ण झाल्यावर तुम्हाला कळते की तुमचा कोणत्या कॉलेजला नंबर लागला आहे.
  • तुमचा ज्या कॉलेजला नंबर लागलेला आहे तिथे जर तुम्ही BAMS कोर्स करू इच्छीता तर तुम्ही तुमची फी भरून तुमचा प्रवेश निश्चीत करू शकता.

BAMS मध्ये काही कॉलेज मॅनेजमेंट थ्रु पण प्रवेश देतात.

BAMS Full Form in Marathiआयुर्वेद, औषध आणि शस्त्रक्रिया बॅचलर.
कोर्स प्रकारपदवीपूर्व
कोर्स कालावधी४.५ वर्षे + १ वर्षाची इंटर्नशिप
कोर्स फीसरासरी फी 2.5 लाख प्रतिवर्ष आहे (तुम्ही ज्या महाविद्यालयात प्रवेश घेत आहात त्यावर अवलंबून आहे)
पात्रता12वी विज्ञान (PCB) इंग्रजीसह उत्तीर्णबारावी सायन्समध्ये किमान ५०%- NEET परीक्षा उत्तीर्ण
BAMS Information in Marathi

बीएएमएस कोर्सची प्रवेश प्रक्रीया थेाडक्यात :

NEET परीक्षेचे फॉर्म सुटतात — NEET परीक्षेला बसण्याची तुम्हाला फॉर्म् भरावा लागतो — परीक्षा देणे — रीझल्ट डीक्लेर होतो — कॉन्सीलींग सेशन होतात — सीट अलॉट केले जातात — प्रवेश पक्का केला जातो.

NEET प्रवेश परीक्षेला तुमच्या 11 वी आणि 12 वी च्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जातात.

त्यामुळे तुम्हाला जर बीएएमएस कोर्स चांगल्या कॉलेजमधुन करायचा असेल तर 11 वी आणि 12 वी चा अभ्यासक्रमाचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे.

BAMS कोर्स पूर्ण झाल्यावर पुढे काय?

BAMS कोर्स पुर्ण झाल्यावर तुम्हाला काम करण्याच्या भरपुर संधी भेटतात.

तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर म्हणुन सरकारी कींवा खाजगी दवाखाण्यामणध्ये काम करू शकता, तुम्ही एखादया संशोधन संस्थेत संशोधक म्हणुन काम करू शकता, तुम्ही थेरपिस्ट म्हणुन काम करू शकता, कींवा मोठया कंपनी मध्ये MR (मेडीकल रिप्रेझेंटेटीव्ह) म्हणुन तुम्हाला काम भेटु शकते.

BAMS झाल्यावर विदयार्थी शक्यतो खाजगी दवाखाने, सरकारी दवाखाने, संशोधन केंद्र कींवा क्लीनिक्स मध्ये काम करतात. बरेच विदयार्थी स्वत:चा क्लीनिक टाकुन डॉक्टर म्हणुन रूग्णांची सेवा करतात.

BAMS कोर्स पुर्ण केल्यावर तुम्ही पुढे तुमचे शिक्षण पण चालु ठेवु शकता. तुम्ही आयुर्वेदा मध्ये एमडी करू शकता, कींवा एमबीए कींवा एलएलबी सारखे कोर्स करू शकता.

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
2 Comments
Inline Feedbacks
View all comments
Pratiksha Pandurang Gaikwad

फिस किती आहे?BAMS.