मित्रांनो! तुम्ही नर्सिंग कोर्स बद्दल तर नक्कीच ऐकले असेल. पण या nursing मध्ये देखील विविध प्रकार पडतात, हे तुम्हाला माहिती आहे का? ANM हा एक नर्सिंग कोर्स आहे. आजच्या लेखामध्ये आम्ही ANM Nursing course information in Marathi घेऊन आलोत.
ANM म्हणजे काय?
नर्सिंग हे एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण विविध प्रकारे रुग्णांची सेवा करू शकतो. सध्याच्या काळा मध्ये नर्सिंग हे एक खूप महत्त्वाचा आणि जास्त मागणी असलेले क्षेत्र आहे. ANM Full Form म्हणजेच Auxiliary Nursing Midwifery. ANM हे हॉस्पिटल मध्ये रुग्णांच्या विविध प्रकारे सेवा करण्यासाठी तत्पर असते.
ANM हा वैद्यकीय क्षेत्रात संबंधीचा एक नर्सिंग कोर्स आहे.
Related – Nursing course information in Marathi
ANM nursing course थोडक्यात माहिती:
ANM हा डिप्लोमा कोर्स आहे. ANM कोर्समध्ये रुग्णांची काळजी कशी घ्यायची, उपकरणांची काळजी कशी घ्यायची, रुग्णांना वेळेवर औषधोपचार देणे आणि नोंदी कशी ठेवायची हे शिकवले जाते.
ANM ला सहाय्यक उपचारिका नर्स असे म्हटले जाते. ANM Nursing course करून तुम्ही शहरी किंवा ग्रामीण भागातील सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये काम करून तुमच्या करिअरची सुरुवात करू शकता.
ANM कोर्स पूर्ण केल्यानंतर सुरुवातीचा पगार 10,000 ते 15,000 रुपयांपर्यंत असतो.
ANM nursing course साठी आवश्यक के पात्रता:
ANM nursing course साठी तुम्ही निवेदन करू इच्छितात तर तुमच्याकडे आवश्यक या पात्रता असणे गरजेचे आहेत.
- १२वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच तुम्ही ANM मध्ये प्रवेश घेऊ शकता.
- तसेच जो उमेदवार यासाठी निवेदन करणार आहे तो वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे खूप गरजेचे आहे.
- प्रवेशासाठी किमान वय 17 वर्षे असावे.
- तुम्ही वयाच्या ३५ वर्षापर्यंत प्रवेश घेऊ शकता.
वर्षातून एकदा प्रवेश प्रक्रिया आयोजित केली जाते.
ANM nursing course साठी साधारणता किती खर्च येतो?
ANM हा साधारणता दोन वर्षाचा कोर्स आहे. या कोर्सची फी साधारणता दहा हजार ते 60 हजार प्रति वर्षे आहे. तसेच तुम्ही मान्यताप्राप्त खाजगी महाविद्यालयातून हा कोर्स करणार असेल तर त्यासाठी अधिक फी भरावी लागते.
ANM nursing course मध्ये काय शिकविले जाते:
ANM nursing course मध्ये प्रामुख्याने डॉक्टरांच्या गैरहजेरी मध्ये एखाद्या रुग्णाची काळजी कशी घ्यावी याबद्दल शिकवले जाते या व्यतिरिक्त ANM nursing course विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
सामुदायिक आरोग्य नर्सिंग, पोषण, आरोग्य संवर्धन, मानवी शरीर आणि स्वच्छता, पर्यावरण स्वच्छता, मानसिक आरोग्य, संक्रमण आणि लसीकरण, संसर्गजन्य रोग, प्राथमिक वैद्यकीय सेवा, प्रथम उपचार, बाल आरोग्य, सुईणी, आरोग्य केंद्र व्यवस्थापन, प्रसुतीपश्चात वार्ड, इ. प्रशिक्षण दिले जाते.
ANM nursing course पूर्ण झाल्यावर मला जॉब भेटतो का? ANM या कोर्सला स्कोप आहे का?
ANM nursing course पूर्ण झाल्यावर तुम्हाला जॉब भेटू शकतो. ANM nursing course पूर्ण झाल्यावर तुम्ही कोणत्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सहाय्यक उपचारिका नर्स म्हणून काम करू शकता. या व्यतिरिक्त एखाद्या एनजीओ मध्ये, ग्रामीण स्वास्थ केंद्रामध्ये, मेडिकल लॅबोरेटरी मध्ये, क्लिनिक मध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये आणि ग्रामीण स्वास्थ्य कर्मचारी म्हणून काम करू शकता.
ANM nursing course पूर्ण झाल्याने पुढे कोणते शिक्षण घेऊ शकतो?
ANM nursing course पूर्ण झाल्यावर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये सहाय्यक उपचारिका नर्स म्हणून काम करू शकता. याव्यतिरिक्त जर तुम्हाला पुढे शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतर कोणत्याही कोर्ससाठी किंवा पदवीसाठी अप्लाय करू शकता.
ANM नर्सिंग कोर्सनंतर मी काय करू शकतो?
ANM नर्सिंग कोर्सनंतर तुम्ही खालील गोष्टी करू शकता –
- तुम्हाला नोकरी मिळू शकते
- एकदा तुम्ही राज्य परिचारिका नोंदणी परिषदेत नोंदणी केल्यानंतर तुम्ही GNM अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता.
- GNM नंतर तुम्ही B.Sc नर्सिंग आणि/किंवा B.Sc पोस्ट बेसिक नर्सिंग पूर्ण करू शकता
“ANM nursing course information in Marathi” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.